Sunday, July 12, 2009

काळा

दिवस जसा सरत जातो
अंधार जसा पडत जातो
सगळे रंग आपली साथ सोडतात
नेत्र मिटले तरी जो आपल्या बरोबर राहतो
तो एक काळा रंग असतो

वेदना होता आपल्याला , हा लगेच धावून येतो
भुकेने भोवळ आलेल्याला , हाच येउन धीर देतो
डोळस माणसा बरोबरच , तो अंधाचीही साथ देतो
प्रकाशाला देखील , जो आपल्यात सामावून घेतो
तो एक काळा रंग असतो

आपल्या प्रत्येक आनंदात तो आपल्या बरोबर असतो
दु:ख होता आपल्याला , आपण नेत्र मिटून त्यालाच बोलावतो
ईश्वराची प्रार्थना करताना , हा आपल्या बरोबर उभा राहतो ,
निषेध करतानाही , जो आपले निशाण बनतो
तो एक काळा रंग असतो

रंग काळा कृष्णाचा , रंग काळा रामाचा
रंग काळा राक्षसांचा, रंग काळा दानवांचा
रंग काळा स्वप्नांचा, रंग काळा कल्पनेचा
रंग काळा अंधाराचा, रंग काळा अतिप्रकशाचा

शून्याचा रंग देखील काळाच आहे
काळयाविना जग अपूर्ण आहे

कवी: आदित्य तळवलकर

Saturday, July 11, 2009

My मराठी म्हणा किंवा म्हणा माय मराठी

My मराठी म्हणा किंवा म्हणा माय मराठी
विसरु नका, भाषा असते माणसांना जोडण्यासाठी

भाषा हे फ़क्त संवादाचे माध्यम असते
संवाद होणे महत्वाचे, बाकी सारे दुय्यम असते
संवाद सोडून डोकीच फोडायची, तर भाषेची महती कशासाठी
My मराठी म्हणा किंवा म्हणा माय मराठी
विसरु नका, भाषा असते माणसांना जोडण्यासाठी

शुद्ध भाषा बोलणारा , मागासलेला नसतो , श्रेष्ठही नसतो
"weak" भाषा बोलणारा , modern नसतो, तुच्छही नसतो
भाषा कशीही असो , विचारांची प्रगल्भता महत्वाची
My मराठी म्हणा किंवा म्हणा माय मराठी
विसरु नका, भाषा असते माणसांना जोडण्यासाठी

भाषेमुळेच या, आपल्याला शिक्षण मिळते, माहिती मिळते,
भाषेमुळेच चर्चा होते, विश्लेषण होते, ज्ञान मिळते
ज्ञानाचीच ओढ़ असावी, त्यासाठी एका भाषेचा अट्टाहास कशासाठी
My मराठी म्हणा किंवा म्हणा माय मराठी
विसरु नका, भाषा असते माणसांना जोडण्यासाठी
कवी: आदित्य तळवलकर

ह्या कवितेतील My मराठी / माय मराठी हे शब्द या कवितेतून inspired आहेत
http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=20487877&tid=5356953498188480385