Monday, September 28, 2009

बहुमत


The structure of this poem is inspired by "Eka talyat hoti" .. The end is sad but I want to portray the kind of injustice we unknowingly make on minorities. Minority is used here as a broad concept, and is not restricted to religious minority.

मोठे ते कुटुंब , आठ त्यात भावंडे
होते धाकटे ते , परी साताहुनी निराळे

इतरांस आवडे क्रिकेट , आवडी ह्यास गाणे
बिचारे त्या भावंडात , नेहमी पड़े एकटे

बहुमतानी सिनेमा ठरे , बहुमतानी चैनल ठरे,
खायचे असे श्रीखंड याला, बहुमताने आमरसच बने

एके दिनी जेव्हा , खेळण्यास सारे निघाले
"रस्त्यात खेलु नका", आईने त्यांस बजावले

आईकडे दुर्लक्शुनि , ते रस्त्यात खेलु लागले
बहुमताला झुगारुनी, ह्याने बाजुस खेल मांडले

दाऊनी बोट त्याला , सर्वानी त्यास चिडवले
म्हणुनी भित्रा त्याला , सर्वानी त्यास हिणवले

तेवढ्यात वाहन एक , भरधाव वेगात आले
होते इतके जवळ ते की , ब्रेक ही ना लागे

काय करावे हे , ड्राईवरला नाही कळाले
रस्त्याबाजुस एक मूल, मधे दिसली सात मुले

क्षणात हिशोब होउनी , स्टेरिंग गेले फिरवले
परत बहुमतासाठी , अल्पमत गेले चिरडले ... !

कवी: आदित्य तळवलकर

Sunday, September 13, 2009

Item Song !

I was challenged to write an item song .. i was driving at that time and the CD player was playing "Runu zhunu Runu zhunu re bhramara" ... got inspired by this song and the story of bhramar who sits inside the lotus for entire night because it doesnt want to harm the lotus .. to write this "item song"

नाजुक सुन्दर मी कमळ गुलाबी
रस माझा तू चाखशील का ?
मिठीत घेइन घट्ट तुला मी
सांग भूंगा तू होशील का ?

मधाची चव माझ्या हाय न्यारी
अन म्हन्त्यात मला मी हाय प्यारी
कोमल पाशात घेते तुला मी
आज रातच्याला राहशील का ? ...

येना असा मला चख ना असा
उठ ना जवळ माझ्या ये ना असा
तुझ्या नशे मधे होते बेभान मी
माझ्या नशेत तू झुलशील का ? ..

कवी: आदित्य तळवलकर

Monday, September 7, 2009

मोह आणि फूल

लहानपणी जरी होते माझ्या नशिबी दारिद्र्य आले
त्यावेळी माझ्याकडे कुठुनसे काही पैसे आले

त्या पैशांची मी एक भाकरी, एक फूल घेतले
भाकरी ने मला जगवले ..फूलानी का जगायचे ते शिकवले !

खरच का जीवन इतके सरळ असते .. सोपे असते ?
आली अशी वेळ जेव्हा हे चुकीचे वाटते .. खोटे वाटते .. !

आता भाकरी ने भूक भागत नाही ..
का जगायचे.. हे फूल शिकवत नाही !

कशासाठी जगायचे याचा प्रश्नच आता सुटत नाही ..
कधी फूल , कधी बंगला , कधी गाडी .. मोहला या काही अंतच नाही ..

आज जेव्हा तिथे एका मुलाला मी रडताना पाहिले,
त्याच्यासाठी मी एक भाकरी , एक फूल घेतले ..

त्याच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर, जेव्हा फुलासारखेच एक हासू फुलले
मला का जगायचेच नव्हे, तर कसे जगायचे हे देखील कळले !

कवी: आदित्य तळवलकर


Thursday, September 3, 2009

भित्रा

लावतो दिवे आम्ही ..
कारण अंधाराला आम्ही भीतो
पीतो दारू आम्ही ...
कारण शुद्धीला आम्ही भीतो

होतो अहिंसक आम्ही ..
कारण हिंसेला आम्ही भीतो
होतो धार्मिक आम्ही
कारण देवाला आम्ही भीतो

राजकारणापासून आम्ही दूर राहतो
कारण राजकारण्याना आम्ही भीतो
सरकारी नोकरांनाच लाच चारतो
कारण नियामाना आम्ही भीतो

होतो नोकर आम्ही ...
कारण मालकीला आम्ही भीतो
राहतो निराश आम्ही
कारण आशेला आम्ही भीतो

जगतो आम्ही असे मेल्यासारखे
तरीही मृत्युला आम्ही भीतो
मृत्युदेखील आम्हाला शिवत नाही
कारण असल्या भेकडाना तो हात लावायला भीतो !

कवी: आदित्य तळवलकर

Tuesday, September 1, 2009

देव

असे म्हणतात ...
हे जग देवाचा एक खेळ आहे
एका लहान मुलाला मात्र
मी देवाच्या मुर्तिशी खेळताना पाहिले.

बघून हे ...
माझा राग अनावर झाला
त्या मुलाला मी थोबाडीत मारली
अणि तो देव हिसकावून घेतला.

शिक्षेमुळे या ...
तो त्या मूर्तीला रोज नमस्कार करतो
रोज त्याला फुले वाहतो
आणि "देवा" पासून लांबच राहतो !

Wednesday, August 12, 2009

घड्याळ

लहानपणी माझ्याकडे एक घड्याळ होते
पन्नास पैशाना घेतलेले
त्या खोट्या घड्याळाचे खोटे काटे
एकाच ठिकाणी होते घट्ट रोवलेले

माझी खूप इच्छा होती
त्याचे काटे मला हलवता यावेत
किल्ली देऊन ते काटे
हवे तसे फिरवता यावेत

हल्ली मी नवीन घड्याळ वापरतो
पंधरा हजार रुपयांना घेतलेले
ते घड्याळ खरे आहे, त्याचे काटे देखील फिरतात
पण ते कधी थांबतच नाहीत !

आता वाटते,
माझ्या ५० पैश्यांच्या घड्याळा सारखे
याचे काटे पण थांबवता यावेत
आणि जमले तर,
ते उल्टे देखील फिरवता यावेत !

कवी: आदित्य तळवलकर

Sunday, July 12, 2009

काळा

दिवस जसा सरत जातो
अंधार जसा पडत जातो
सगळे रंग आपली साथ सोडतात
नेत्र मिटले तरी जो आपल्या बरोबर राहतो
तो एक काळा रंग असतो

वेदना होता आपल्याला , हा लगेच धावून येतो
भुकेने भोवळ आलेल्याला , हाच येउन धीर देतो
डोळस माणसा बरोबरच , तो अंधाचीही साथ देतो
प्रकाशाला देखील , जो आपल्यात सामावून घेतो
तो एक काळा रंग असतो

आपल्या प्रत्येक आनंदात तो आपल्या बरोबर असतो
दु:ख होता आपल्याला , आपण नेत्र मिटून त्यालाच बोलावतो
ईश्वराची प्रार्थना करताना , हा आपल्या बरोबर उभा राहतो ,
निषेध करतानाही , जो आपले निशाण बनतो
तो एक काळा रंग असतो

रंग काळा कृष्णाचा , रंग काळा रामाचा
रंग काळा राक्षसांचा, रंग काळा दानवांचा
रंग काळा स्वप्नांचा, रंग काळा कल्पनेचा
रंग काळा अंधाराचा, रंग काळा अतिप्रकशाचा

शून्याचा रंग देखील काळाच आहे
काळयाविना जग अपूर्ण आहे

कवी: आदित्य तळवलकर