लहानपणी जरी होते माझ्या नशिबी दारिद्र्य आले
त्यावेळी माझ्याकडे कुठुनसे काही पैसे आले
त्या पैशांची मी एक भाकरी, एक फूल घेतले
भाकरी ने मला जगवले ..फूलानी का जगायचे ते शिकवले !
खरच का जीवन इतके सरळ असते .. सोपे असते ?
आली अशी वेळ जेव्हा हे चुकीचे वाटते .. खोटे वाटते .. !
आता भाकरी ने भूक भागत नाही ..
का जगायचे.. हे फूल शिकवत नाही !
कशासाठी जगायचे याचा प्रश्नच आता सुटत नाही ..
कधी फूल , कधी बंगला , कधी गाडी .. मोहला या काही अंतच नाही ..
आज जेव्हा तिथे एका मुलाला मी रडताना पाहिले,
त्याच्यासाठी मी एक भाकरी , एक फूल घेतले ..
त्याच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर, जेव्हा फुलासारखेच एक हासू फुलले
मला का जगायचेच नव्हे, तर कसे जगायचे हे देखील कळले !
कवी: आदित्य तळवलकर
No comments:
Post a Comment