Thursday, September 3, 2009

भित्रा

लावतो दिवे आम्ही ..
कारण अंधाराला आम्ही भीतो
पीतो दारू आम्ही ...
कारण शुद्धीला आम्ही भीतो

होतो अहिंसक आम्ही ..
कारण हिंसेला आम्ही भीतो
होतो धार्मिक आम्ही
कारण देवाला आम्ही भीतो

राजकारणापासून आम्ही दूर राहतो
कारण राजकारण्याना आम्ही भीतो
सरकारी नोकरांनाच लाच चारतो
कारण नियामाना आम्ही भीतो

होतो नोकर आम्ही ...
कारण मालकीला आम्ही भीतो
राहतो निराश आम्ही
कारण आशेला आम्ही भीतो

जगतो आम्ही असे मेल्यासारखे
तरीही मृत्युला आम्ही भीतो
मृत्युदेखील आम्हाला शिवत नाही
कारण असल्या भेकडाना तो हात लावायला भीतो !

कवी: आदित्य तळवलकर

No comments: