झालो असतो न्यूटन आम्हीही,
पण आमच्या इथे सफरचंदाचे झाडच नाही
हे असले झाड कुणीतरी लावावे लागते
लावून त्याला खत-पाणी घालावे लागते
नंतर मग ते झाड फळ देऊ लागते
भुकेल्याना अन्न, थकलेल्याना निवारा
आणि विचारवंतांना विचार देऊ लागते
ह्या झाडाचे बीज असते उत्सुकतेचे
त्याला पाणी लागते खुल्या विचारांचे
खत लागते प्रयोगांचे
आणि ऊन लागते विश्लेषणाचे
आमच्या इथे पुर्वी असली झाडे होती
सफरचंदाची नव्हे तर चांगली आंब्याची होती
आता मात्रा अशी झाडे उरली नाहीत
सफरचंदाची लावली नाहीत आणि आंब्याची टिकवली नाहीत
आमच्या झाडांना कीड लागली पूर्वग्रहदुषित विचारांची,
अंधळ्या भक्तीची, अर्थशून्य अभिमानाची
आणि दुसर्याच्या अंधानुकरणाची
आता असल्या झाडांऐवजी धार्माभिमानाची इमारत बंधतात
त्या खाली विचारवांतांच्या डोक्यात, वरुन फक्त धोंडे पडतात
आंब्याची कोय सोडा, पण सफरचंदाचे बीजही आमच्याकडे नाही
झालो असतो न्यूटन आम्हीही,
पण आमच्या इथे सफरचंदाचे झाडच नाही
कवी: आदित्य तळवलकर
Zalo asto Newton Amhihi by Aditya Talwalkar is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment