लहानपणी माझ्याकडे एक घड्याळ होते
पन्नास पैशाना घेतलेले
त्या खोट्या घड्याळाचे खोटे काटे
एकाच ठिकाणी होते घट्ट रोवलेले
माझी खूप इच्छा होती
त्याचे काटे मला हलवता यावेत
किल्ली देऊन ते काटे
हवे तसे फिरवता यावेत
हल्ली मी नवीन घड्याळ वापरतो
पंधरा हजार रुपयांना घेतलेले
ते घड्याळ खरे आहे, त्याचे काटे देखील फिरतात
पण ते कधी थांबतच नाहीत !
आता वाटते,
माझ्या ५० पैश्यांच्या घड्याळा सारखे
याचे काटे पण थांबवता यावेत
आणि जमले तर,
ते उल्टे देखील फिरवता यावेत !
कवी: आदित्य तळवलकर